Monday, May 21, 2018

गर्जा भारतमाता




गर्जा भारत माता

भारत माते वंदन तुजला, करीतो हर समयाला llधृll
उंच उंच या पर्वत रांगा,
दोन तटाला सागर लाट,
सागर गर्जतो नाद तुझा हा, गर्जा भारत माता ll1ll
भिंन्न भिंन्न हे धर्म मिळूनी,
भिंन्न भिंन्न हे पंथ मिळूनी,
एकच बनले राष्ट्र हे अमुचे, गर्जा भारत माता ll2ll
सौनिक अर्पिती अपुले जीवन,
करण्या रक्षण तुझेच माते,
नमितो तुजला आणि तयांना, गर्जा भारत माता ll3ll
हिमालय हा उभा राहीला,
करण्या रक्षण तुझेच माते,
तयास आंम्ही वंदन करीतो, गर्जा भारत माता ll4ll
तुझेच आंम्ही बालक माते,
तुझ शांती हे स्वप्न आमुचे,
तयाच साठी झटतो आंम्ही, गर्जा भारत माता ll5ll
आंम्हास देसी स्फुर्ती माते,
उज्वल करण्या तुझीच स्वप्ने
तवचरणी झुकतो आंम्ही, गर्जा भारत माता ll6ll
या मातीशी नाते अमुचे
जुळले आहे जन्मोजन्मीचे,
धन्यची झालो आंम्ही माते, गर्जा भारत माता ll7ll

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

"जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी"

  "जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी" तूच भवानी तू सरस्वती, शक्ती तू या जगताची. तूच अंबिका तूच लक्ष्मी, पार्वती गौरीहरा...