Monday, May 21, 2018

पांडूरंगा





पांडूरंगा

किती पाहू वाट तुझी पांडूरंगा l
भारावले मन तुझसाठी ll

विसरूनी मी हा दुजाभाव आता l
शोध घेई तुझा पांडूरंगा ll

दु:खाचीया वाटे सुख मिळे  आता l
नाम तुझे घेता पांडूरंगा ll

मन धावते हे पंढरीच्या वाटे l
रूप तुझे तेथे दिसेना कसे ll

पांडूरंग असे दु:खीतांच्या संगे l
द्यावयासी सुख दु:खीतांना ll

पांडूरंग असे पिडीतांच्या संगे l
द्यावया आधार पिडीतांना ll

सापडेल वाट तुझी पांडूरंगा l
चुकणार नाही आता कोठे ll

दु:खीत पिडीत असतील जेथे l
तेथे पांडूरंगा पाय तुझे ll

*****   संभाजी  कृष्णा  घाडी
*****  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

🪶टक्कल आहे फॅशन आज!

  🪶 टक्कल आहे फॅशन आज! टक्कल माझं पडणारं पाहून, मला जरा टेन्शन येतं, पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून, माझंच मन धीर देतं. संपली आता पन्नाशी,...