Wednesday, May 23, 2018

अनामिका तू

अनामिका तू

रेखीले तूज स्वप्नात मी,
ना देखीले मम डोळ्यानी;
अनामिका येशील कधी तू,
माझ्या ह्रृदय मंदिरी.

सुरेल तूझे असतील डोळे,
लाजवतील निल नभा;
ओठ लाल असतील तुझे,
गुलाब ते फुलले कुठवरी.

गालावरी असेल तुझ्या,
भावतो लाजण्याचा;
मज टाकतील मोहून,
दोन नयनांच्या पापण्या.

केस तुझे असतील,
लांब लांब रंग काळा;
गो-या तुझ्या वर्णाला,
शोभेल लाल टिळा.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...