
पटकुळीची फुले
किती तरी फुले फुलतात,
पटकुळीच्या झुडपाला.
चार पाकळी फुलांचा,
गुच्छ असतो भरलेला.
लाल रंगी फुलानी,
झाड दिसते शोभूनी.
पण नाही पाहत कोणी,
सौंदर्याची मोहीनी.
सुगंध नाही त्याला,
म्हणून करती कानाडोळा.
मोह नाही वाटत कुणा,
त्या मोहक फुलांचा.
नाही सुद्धा फिरकत भूंगा,
तो ही करतो कानाडोळा.
दुरूनच सांगतो फुलाला,
सुगंध नाही तुला.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment