Wednesday, May 23, 2018

कुठचं काही जुळत नाही


कुठचं काही जुळत नाही.

किती तरी दुर रहातो;
आठवण तुमची सतत येते.
धावत जाव तुमच्याकडे;
तर रस्ता फार दुरचा आहे.

या वेडया वाकडया विचारांना;
मनाची फक्त साथ आहे.
धावत जाते तुमच्याकडे;
त्याला वात्सल्याची आस आहे.

म्हणतात मुला व्यावसाय आहे;
शिक्षणाची काय गरज आहे.
मन मात्र खंबीर आहे;
शिक्षण हाच मार्ग आहे.

शिक्षणाची आस सुटत नाही;
पुस्तक हातून ठेवत नाही.
तुमचा विरह पटत नाही;
कुठचं काही जुळत नाही.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...