Wednesday, May 23, 2018

चंद्र हासरा


चंद्र हासरा

चंद्र हासरा दिसतो मजला,
मज भासतो सोन्याचा गोळा.
लालबुंद होऊनी वर आला,
शुभ्र चांदणे देण्याला.

हळू हळू वर येई,
नाही कोणी अडवी त्याला.
मज सांगे चल जावूया,
आपुल्या प्रिय घराला.

आकाशात फिरतसे,
रात्रीच्या वेळा.
मध्येच लपून पळे,
ढगातून सारखा.

मज सवे धावत येई,
अगदी माझ्या वेगा.
मागे राहीला कुठे हा,
मी वळणावरून जाताना.

परत आला अती वेगाने,
भेटण्या मजला.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

🪶टक्कल आहे फॅशन आज!

  🪶 टक्कल आहे फॅशन आज! टक्कल माझं पडणारं पाहून, मला जरा टेन्शन येतं, पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून, माझंच मन धीर देतं. संपली आता पन्नाशी,...