Monday, May 21, 2018

मैत्री आपली खुलेल गडे


मैत्री आपली खुलेल गडे


नाही मला तोडायची आपल्यातली मैत्री,
तशीच जपून ठेवायची होती आयुष्यभरासाठी.

झाल्या असतील चुका, माझ्या तुझ्या हातून,
अशीच जपून ठेवायची का चुकांची खुण?.

आयुष्य असच वाया घालवायच का?
चुकीच्या खुणा उगाळत बसायच्या का?

माफ नाही करणार का आपण एकामेकाना?
आयुष्यभर असाच खोटा स्वाभिमान जपणार का?

खोटा स्वाभिमान काय उपयोगाचा!
जो तोडतो आपल्या मैत्रीला!

मी टाकतो एक पाऊल पुढे,
तु पण टाक तुझ पाऊल पुढे.

मैत्री आपली खुलेल गडे
नको घेवू आडेवेडे.

***   संभाजी  कृष्णा  घाडी
*** वेताळ वांबर्डे

No comments:

Post a Comment

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...