Wednesday, May 23, 2018

तू फुलविला वसंत



 तू फुलविला वसंत

तू फुलविला वसंत या मम ह्रृदयी,
हरविली मम मती तुझ पहाता क्षणी.

रंग तुझा लावितसे मज वेड,
रंगात तुझ्या लपली सौंदर्याची खूण.

रंग तूझा लाल गुलाबी पिवळसर,
अंगात तुझ्या रंग असे हिरवट.

तुझे डोलने डौलदर,
तुझ्या अंगी असे मोहिनी सुवास.

मन हे माझे भ्रमरापरी,

पिंगा घाली तुझ्याच भवती.


किती तुझी रूपे पण नाव ते एकच,
गुलाबराणी तू लाविले मज वेड.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नाती कशी अशी ही...

  नाती कशी अशी ही... ​ नाती कशी अशी ही, विस्कळीत झाली l जी हृदयानजीक होती, ती फार दूर गेली llधृll ​गेले किती उन्हाळे, पावसाळे किती गेले l ना...