Monday, May 21, 2018

माझे गावं


माझे गांव

ते गाव असे मनोहर,
तेथे फुले फुलती सुंदर,
चोहोबाजूनी असे डोंगर,
पुर्व दिशेला रांगणागड.

सुर्य उगवतेा गडावरून,
पहा झाला अरूणोदय,
हाक मारीतो मंजूळ,
उठा उठा सकलजन.

नदी वाहते खळाखळा,
लाविते कामाचा लळा,
सह्याद्री करीतो राखण,
म्हणतो रहा खुशाल.

वाटते गांव शहरात,
वसले आहे जंगलात,
वाटते गांव मुंबईत,
परी आहे कुडाळात.

गांव नांदते आनंदात,
सुखविते रहीवाशास,
म्हणूनी मज आवडते,
माझे गांव गिरगांव.
*****   संभाजी  कृष्णा  घाडी
*****  वेताळ बांबर्डे


(गिरगांव हे माझे आजोळ असून त्या गांवात व्यावसाय धंद्या निमित्त वडील स्थाईक झाले होते. गिरगांवात (ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग) मी लहानाचा मोठा झालो असून  वयाची 25 वर्षे तेथे घालविली आहेत.)

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...