Monday, May 21, 2018

गुलाब राणी




 गुलाब राणी

फुलसी सकाळी सुंदर माळी
सुगंध वाहे रानेामाळी
सुहास देसी स्वच्छ मनानी
फुलती तू ग गुलाबराणी

माळी राखीतो पाणी घालीतो
तुझ्यासाठी तो तनमन हरतो
काटे तूझे करीती रक्षण
नको स्पर्ष तो सावध हात.

परी मनाला वेड लागले
त्या गुलाबी सुमनाचे
हात वळती फुलापासी
काटे टोचती मग हातासी.

वेदना न होती परी हातासी
पाहूनी त्या सुमनासी
तुच फुलांची गुलाबराणी
नयनांना तू वेड लाविसी.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नाती कशी अशी ही...

  नाती कशी अशी ही... ​ नाती कशी अशी ही, विस्कळीत झाली l जी हृदयानजीक होती, ती फार दूर गेली llधृll ​गेले किती उन्हाळे, पावसाळे किती गेले l ना...