Monday, May 21, 2018

लोकमान्य तो मान्य पावला




लोकमान्य तो मान्यपावला

लोकमान्य तो मान्य पावला लोकांना l
मनोभावे फुलेवाहूनी नमितो तुजला llधृll

कोकणात तू जन्म घेतला पार्वती आई उदरी l
मानवतेचा धडा देवूनी वाढविले मग तूजला l
म्हणनी अर्पिले जिवन अपुले भारत मातेला ll1ll

हाक देवूनी घरोघरी तू जागविसी सर्वांंना l
धडा देवूया सर्व मिळोनी ब्रिटीशांच्या सत्तेला l
गुलामीतूनी मुक्त होऊया परकीयांच्या ll2ll

वृत्तपत्र केसरी काढूनी हाक देसी सर्वांना l
शिवजयंती गणेशोत्सव करूनी जमविशी तू लोकांना l
अशाप्रकारे जमविशी जनता ब्रिटीशांसी लढण्याला ll3ll

लढसी तू स्वातंत्र्यासाठी हक्क मानुनी तूझा l
हक्क सांगसी ठांमपणे तू ब्रिटीशांच्या सत्तेला l
घेवूनी स्फुर्ती तुझीच जनता हटवी ब्रिटीशांना ll4ll

वृक्षतावसी स्वातंत्र्याचा अभिलाषान धरीता l
फुले फळे धरण्याआधी तू जासी सोडूनी आंम्हा l
परी जगी तू अमर राहसी या समयाला ll5ll

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

🪶टक्कल आहे फॅशन आज!

  🪶 टक्कल आहे फॅशन आज! टक्कल माझं पडणारं पाहून, मला जरा टेन्शन येतं, पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून, माझंच मन धीर देतं. संपली आता पन्नाशी,...