Monday, May 21, 2018

ही पण वेळ टळून जाणार




ही पण वेळ टळून जाणार

कितीतरी दिवसानी, मनात एक वादळ आलं;
तुझ्या त्या पहिल्या भेटीत, मन माझ हरवून गेलं.

वाटत होतं मनात मला, माझं प्रेमाच पर्व संपल;
पण तूला पाहता मला, माझ मनं फुलवू लागलं.

तुझ्या प्रत्येक भेटीत, मी मला तुझ्यात पाहतो;
माझ्या या डोळयांमध्ये, तुझा चेहरा साठवून ठेवतो.

माझ्या मनातलं तुला, सांगावस नेहमी वाटतं;
पण तुझ्या होकाराला, माझ मनच घाबरतं.

बसून राहतो एकटाच, फक्त तुझा विचार करतो;
माझ्या विचाराना मी, मनमोकळे रान देतो.

मी हा असाच आहे, मनातल्या भावना मारणारा;
नकाराच्या भयाने, मनातच कुढत रहाणारा.

बघ तुला जमल तर, माझ्या मनातील उमगल तर;
तू एकदा प्रयत्न कर, माझ्या मनातल तूच बोल.

नाहीतर मी असाच, मनातल माझ्या मनात ठेवणार;
उलघडल नाही तर, ही पण वेळ टळून जाणार.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...