Monday, May 21, 2018

जिंकायचे नाही मला तुला हरवून


जिंकायचे नाही मला तुला हरवून

जिंकायचे नाही मला तुला हरवून,
स्पर्धा नाही करायची मला, तूला नमवून.

नको मला हे युद्ध, ज्यात तुझा पराजय होईल,
मला फक्त लढायचय, ज्यात तुझा विजय होईल.

युद्ध नको मला, हवी फक्त शांतता.
तु फक्त नम्र होऊन बघ, जय होईल तूझा.

नम्रतेत शक्ती आहे, नम्रतेत शांती आहे.
मने जिंकून जग जिंकण्याची, नम्रतेत ताकद आहे.

विचार कर निश्चय कर, मन तूझ मोकळ कर,
सोडून दे द्वेष सारा, तू माझ्यावर विश्वास कर.

***   संभाजी  कृष्णा  घाडी
*** वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...