नाती कशी अशी ही...
नाती कशी अशी ही, विस्कळीत झाली l
जी हृदयानजीक होती, ती फार दूर गेली llधृll
गेले किती उन्हाळे, पावसाळे किती गेले l
नाती जळून गेली, नाती धुवून गेली ll१ll
भेट झाली जरी समोरी, मने फार दूर गेलीl
जरी भेटलो समोरी, ओळखीची खूण गेली ll२ll
येता येता शब्द ओठी, वाणी अबोल झाली l
मनातील भावनांची, इथे धुळधाण झाली ll३ll
शोधतो मी आजही, ती माणसे हरवलेली l
अश्रूंच्या या पुरामध्ये, माणसे वाहून गेली ll४ll
गैरसमजाची भिंत, नको तितकी वाढली l
आपुलकीची ती वाट, अंधारात हरवली ll५ll
आरोपांच्या धुरळ्यात, माया ती विरून गेली l
आपुलकीची ती जागा, आता रिकामीच उरली ll६ll
