निसर्ग माझा
निसर्ग माझा किती देखणा,
रंग फुलानी बहरूनी आला,
हिरवी झाडे लाल फुले ही,
लाविती वेड या मनाला.
कोण्या झाडावरी बौसोनी,
गाती पाखरे मंजुळ गाणी,
सुरराणी कोकीळा ही काळी,
कुहूकुहू गातसे ती गाणी.
दगडानाही पाझर फुटूनी,
पाण्याचा तो झरा वाहतो,
मला न ठावे कोठूनी येते,
मधुर जल हे दगडामधुनी.
उंच उंच ही झाडे झुडपे,
डोलती अपुल्या तालावरती,
संगत मिळते त्या झाडांना,
मंद वाहत्या त्या वाज्याची.
वेड लावितो असा निसर्ग हा,
मोहूनी टाके मम मनाला,
तव चरणी मी करीतो वंदन,
सुख शांती दे तव बाळांना.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment