
गणराया रे
गणराया रे माझ्या देवा l फुले वाहतो मी रे तुला ll
चांदीचा पाळणा सोन्याने सजविला l
नेती भक्त पुजण्या तूला llधृll
करीती सडासंमार्जन घरा l लाविती पताका चोहेा बाजूला ll
घर स्वच्छ करून रंगरांगोटी करून l
तुझ्यासाठी सजवती घरा ll1ll
सजविती माटी फुलापानाने l तेथे बांधीती नारळ बेडे ll
काकडी व केळे वेगवेगळी फळे l
आणती तुझ्यासाठी रे देवा ll2ll
चौरंगावर ठेवती तूला l पंचारती दोंन्ही बाजूला ll
नंदादिप पेटवून अगरबत्ती लावून l
घालती पुजाआरती तुला ll3ll
करती पुजा तूझी रे देवा l घालती पुष्पांचा हार तूला ll
दुर्वा तूळशी वाहून भावे हात जोडून l
करती तूझी आरती देवा ll4ll
रजा संपेल तूझी रे देवा l
पाण्यामध्ये पोहचवती तूला ll
तुझी आठवण येवून मन खिन्न होवून l
अस्थिर होतो मी सदा देवा ll5ll
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment