Monday, May 21, 2018

ढगांची किमया



 ढगांची किमया.

धडाम धुडूम धडाम धुडूम,
करती हे ढग ll
उंच उंच आभाळी जावूनी,
मिरवीती आपुला डौल ll
वारा येई जोराचा,
पळवी ढगांना सरासरा ll
नभात रात्री चोरूनी बघता,
चंद्र पळतो भराभरा ll
पहाटेचा तेा थंड वारा,
भेटतो ढगांना जरासा ll
घाबरती हे ढग वाज्याला,
वाज्याच्या त्या थंडपणाला ll
ढगांचा मग धिर सुटला,
विरघळला कलिजाचा गोळा ll
पाणी झाले त्या कलिजाचे,
पसरले धरतीवरती सारे  ll
भिजली पृथ्वी त्याच जलाने,
पाणीच पाणी वाहू लागले ll
मग शेतकज्यानी राबराबूनी,
शेतामध्ये धान्य पेरले ll
शेतामध्ये धान्य पिकले,
कष्ठाचे ते सोने झाले ll

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...