Wednesday, May 23, 2018

प्रेमगंध

 प्रेमगंध

प्रितीच्या पाखरा,
नको भराज्या मारू;
जिवनातल्या आनंदाला,
गगनात नको सोडू.

उतर खाली भूतलावरी,
मौज करूया दोन जिवानी;
मौजेतल्या आनंदानी,
खुलवूया पृथ्वी सारी.

मनातल्या भावनांचा,
वाहूदे ग आज प्रवाह;
मिळवूनी हे दोंन्ही प्रवाह,
करू प्रितीचा इथे संगम.

संगमातल्या त्या मौजेची,
तुला न ठावे मौज आसुरी;
दोन जिवांच्या प्रेम कळीची,
फुलनारी ती प्रेम पाकळी.

फुलूदे ग या इथे फुलाला,
सुगंध वाहिल चौफेराला;
निसर्ग होईल धुंद आज गं,
तुझ्या नी माझ्या प्रेमगंधानं.
******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

​पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी?

 ​पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी? ​कान्हाला राधा हल्ली, भेटलीच नाही, पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी? ​यमुनेचा तीर आता, सुना सुना भासे, र...