Wednesday, May 23, 2018

वेड्या मना तू


 वेड्या मना तू

वेड्या मना तू,
नको कुणा माझं म्हणू.
माझ्या भावनांशी तू,
नको असं खेळू

दुनिया फार वेगळी आहे,
समोर तूला तूझी म्हणेल.
तू दुर झाल्यावर,
तिच तूला विसरेल.

बंध म्हणे रेशमी असतात,
काही केल्या नाही तूटत.
तोडणारे झटकण तोडतात,
तुटल्यावर ते रक्त काढतात.

विसरणारे सहज विसरतात,
भावनांचा कुठे विचार करतात?
भावना खुप नाजूक असतात,
दुखावल्यावर खंगत जातात.

भावना संपल्यावर,
सर्व काही संपत.
या जगातील माझं,
अस्थित्व तरी कुठे उरतं?

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

🪶टक्कल आहे फॅशन आज!

  🪶 टक्कल आहे फॅशन आज! टक्कल माझं पडणारं पाहून, मला जरा टेन्शन येतं, पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून, माझंच मन धीर देतं. संपली आता पन्नाशी,...