Monday, May 21, 2018

लागला डुलायला




लागला डुलायला

आवड मला भजनाची , पंढरी जायाची l
पंढरी जायाची, विठोबा पाहायाची ll
पंढरीचा हा पंढरीनाथ लागला डोलायला l
जवा संतांच्या भजनाचा रंग बहरत चालला llधृll

काय सांगू तूंम्हा या देवाची गोष्ठ l
संतांच्या भजनात झाला हा दंग l
संतांच्या भजनात टाळांच्या गजरात लागला डोलायला ll1ll

जोवर नव्हती संतांची जोडी
रूसून बसे हा विठेवरी l
संताच्या चाहूलीन टाळांच्या नादात लागला डोलायला ll2ll

आषाढी कार्तिकी एकादशी l
संतजन येती पंढरपूरी l
संतांच्या गजरात तबल्याच्या तालात लागला डोलायला ll3ll


*****   संभाजी  कृष्णा  घाडी

*****   वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...