🪶 आई, जीवनाचा अर्थ आहे!
घरी रोजच जातो आपण,
तो तर नित्य प्रवास आहे.
वाट पाहणार असेल कोणी,
तर घरी जाण्यात अर्थ आहे.
जेवण जेवतो रोजच आपण,
शरीराची ती गरज आहे.
प्रेमाने कोणी वाढलं जेवण,
तर जेवणात आनंद आहे.
बायको, मुलं, भाऊ, बहीण,
नात्यांचा ‘रेशमी बंध' आहे.
आईसारखं जीव लावणं
सांगा कुणाला जमणार आहे?
कामा वरून थकून येणं,
हे तर आता रोजचं आहे.
थकलेला चेहरा वाचणार,
आई शिवाय कोण आहे?.
वाट पाहणारी आईच असते,
तिचं काळीज वेगळं आहे.
बाकी आपलं काळजी वाहू,
घरी एक सरकार आहे.
जीवनातील प्रत्येक क्षण,
आईवाचून व्यर्थ आहे.
आईमुळेच तर आपल्या,
जीवनाला आज अर्थ आहे.

No comments:
Post a Comment