Monday, May 21, 2018

माझी आठवण





 माझी आठवण

माझी आठवण तिला कधी,
यावी अस वाटल नाही.
आठवणीच्या त्या जगात,
तिला कधी पाठविल नाही.
रोपट वाढलं फुले फुलली,
कोमेजली केव्हा समजल नाही.
माझ्या मनातील मुकी कळी,
मात्र कधी उमलली नाही.
मुकी कळी होती म्हणून,
फुलण्याची वाट पाहीली.
मात्र ती फुलण्या आधी,
माझ्या पासुन दुर गेली.
तिच्या अशा या विरहाने,
माझी कळी मुकीच राहीली.
मात्र तिच्या आठवणीने,
मुक पणे कोमेजून गेली.
वाटत मनात नव्याने,
तिच कळी फुलून यावी.
माझ्या जीवनातल्या अश्रूंची,
सुंदर मोहक फुले व्हावी.
तिच्या अशा कित्येक आठवणी,
माझ्या मनाला नेहतीच जाळती,
म्हणून माझ्या आठवणीत
तिच्या मनाला पाठवित नाही.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...