Monday, May 21, 2018

गाठ रक्षाबंधनाची




 गाठ रक्षाबंधनाची

असे श्रावणाचा मासं,
त्यात पौर्णिमेची साथ.
दिन सौख्याचातेा आज,
हाती बांधावे बंधन.
वाट पाहतो मी ताई,
कोण म्हणे मज भाई.
हिणविती मज केाणी,
नाही रक्ताची ही नाती.
सख्या बहीणीचे नाते,
नाही दिले ते दैवाने.
वाट पाहतो मी इथे,
कोणी जोडील हे नाते.
ताई म्हणू मी कोणाला,
कोण ऐके माझी हाक.
अश्रू पुसेल ते कोण,
श्रेष्ठ नाते हे जोडून.
ओवाळील कोण मला,
राखी बांधील ती कोण.
नाही विकत घेवून,
स्वत: हाताने विणून.
गाठ रक्षाबंधनाची,
बांधावीती घट्ट तुंम्ही.
ज्योत विझेल प्राणाची,
नाही तुटतील नाती.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

🪶टक्कल आहे फॅशन आज!

  🪶 टक्कल आहे फॅशन आज! टक्कल माझं पडणारं पाहून, मला जरा टेन्शन येतं, पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून, माझंच मन धीर देतं. संपली आता पन्नाशी,...