
निसर्ग राजा
हे निसर्ग राजा रूप तूझे हे रम्य भासते
मला,
मी सर्व सुख दु:ख हरोनी आलो भेटण्या तूला.
तू आमूचा प्रभू मी तुझा भक्त,
तुझ वाचूनी मज नमिळे निवारा.
या समयी मी सुधबूद हरूनी,
रमलो आहे तूझ्या भक्तिला.
वाहतोवारा सौंदर्याचा,
थंड भासतो मला.
मी शोधतो रूप तूझे हे,
वेड लागले मला.
तू किती अनंत रूपे नटसी या जगी,
मात्र मी एक माणूस असे या भू वरी.
झडे झूडूपे नदी या तुझीच रूपे सारी,
धरतीचा तो गंध भासतो श्रेष्ठ अत्तराहूनी.
नद्या डोंगरी माळावरती खूप फिरेन या समयी,
पण माझे हे कार्य आता कोण पुर्ण करी.
जन्म माझा तुला सजविण्या तुझ्याच इच्छेवरूनी,
मी पुरे करीन हेची कार्य या मानव जन्मी.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment