Monday, May 21, 2018

एक पाखरू




एक पाखरू.

एक पाखरू धावते मज पाहूनी;
येई आडवे वाटेवरती.
घाबरते मज मनातूनी;
पण ओळखीते मज स्वभावातूनी.
रंग असे पाठीवरती निळा;
उदरापासी लाल पिवळा.
पायाना तो निळसर तांबडा;
पिसारा असे निळा निळा.
येई मजकडे जरा पुढे;
जाई परतूनी झाडाकडे.
मी तयास बोलावी या हस्ताने;
पण छे! दुर पळे.
का घाबरसी मज पाहूनी?
का भूलवी स्व ह्रदयासी ?
मी असा अभागी असे या जगी;
म्हणूनी का मज पासूनी दुर पळसी.
तरी छे! तू तर मजला वेड लावीले;
म्हणूनी मी धावतसे तुझकडे.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...