Monday, May 21, 2018

गंध तुला ना आला कधी



गंध तुला ना आला कधी

प्रेम तुझ्यावर केले होते,
तुला कधी ते कळले नाही.
फुलणाऱ्या त्या मम मनाचा,
गंध तूला ना आला कधी.

तव नयनात मी नयन लावूनी,
पाहत असे तुझा चंद्रमा.
भाव माझ्या नयनांचा तू ,
कधीच समजू शकलीस नाही.

चंद्र बिंब हे तूझे हासरे,
पाहूनी मी सदा फुलतसे.
सदाफुलीच्या त्या फुलांचा,
गंध कधी दरवळला नाही.

मम मनात मी तुलाच वरीले,
मम जिवन मी तुझसी अर्पिले.
अशी रंगली कितीक स्वप्ने,
स्वप्न सत्य कधी झाले नाही.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

🪶टक्कल आहे फॅशन आज!

  🪶 टक्कल आहे फॅशन आज! टक्कल माझं पडणारं पाहून, मला जरा टेन्शन येतं, पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून, माझंच मन धीर देतं. संपली आता पन्नाशी,...