तुझ्यासाठी जगत होतो,
तुला कधी कळले नाही.
तुझ्यात मला पाहत होतो,
तू कधी जाणले नाही.
कितीक रात्री नी दिवस,
तुझ्यासाठी घालवत होतो.
जीवनातला प्रत्येक क्षण,
तुझ्यासाठी वेचत होतो.
जवळ कधी आलो नाही,
तुझ्याशी कधी बोललो नाही.
दुरून तुला पाहिल्यावर,
माझा मीच उरलो नाही.
पटणार नाही हे तूला,
नजरेने नजरेसाठी जगणं.
स्वत:मध्ये स्वत:च मरून
माझं तूझ्यासाठी जगणं
वाटत मनात आता मला,
तुला वेगळया नजरेने पहाव.
पण तूच नाही बदललीस तर,
नजरेने तरी का बदलावं.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment