
विचार
प्रत्येक माझा हा विचार,
भासतो मला वाज्यासारखा;
येतो कसा थेाडक्या पुरता,
झाडून जातो या मनाला.
राहतात त्यातून काही कपचे,
पण नाही जुळत एकमेकांना;
गेलेला असतो त्यातील,
मुख्य विचारांचा मथळा.
अभ्यासाच पण होत असच,
वाचत जातो भरा भरा;
हा येतो मध्येच जरासा,
विस्कटून टाकतो अक्षरांना.
अस किती दिवस चालायच हे,
अंत आहे ना या वाज्याला;
कि होईल अंत जेव्हा माझा,
संपणार आहे हा पसार.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment