Wednesday, May 23, 2018

नव्या वर्षास (1995)


21. नव्या वर्षास (1995)

1.

अमावाश्येच्या काळ्या रात्री,
जन्म झाला तुझा.
काळोखातूनी प्रकाश देसी,
या नव्या चक्रला.

दिवसा काठी वाढतील त्या,
चंद्रमाच्या कला.
तसीच प्रगती घडूदे,
या नव्या वर्षाला.

2.

स्वागतासाठी तुझ्या,
आतूरले माझे डोळे
एकोणीसशे पंचान्नव हे,
ह्रृदया मध्ये नाव कोरले.

अमावाश्येच्या दिवशी येवूनी,
पौर्णिमेचे ध्येय गाठीशी.
तसेच नेसी या भारता,
प्रगतीच्या तेजापासी.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...