तुझा
राग शांत होण्याची मी वाट पाहत आहे.
खरतर
मला तुझ्याशी स्वत: बोलायच आहे.
भिती
वाटते मला तुझ्याशी मुद्दम बोलायची.
रागावून
तू माझ्या पासून आणखी दुर जाशिल.
तूझी
मैत्री मला अशी सहज नाही गमवायची.
तुझी
मैत्री टिकवण्यासाठी मला मांडवली करायची.
बोलशील
का माझ्याशी मी सुरुवात केल्यावर?
देशील
का साथ, मी
हात पुढे केल्यावर?
हात असेल मैत्रीचा, विश्वास
असेल आपुलकीचा.
नाही
नको म्हणू आता, स्विकार
कर मैत्रीचा.
*** संभाजी कृष्णा घाडी
*** वेताळ वांबर्डे
No comments:
Post a Comment