Monday, May 21, 2018

स्वभाव




स्वभाव

नाही माझा स्वभाव,
मिळून मिसळून वागण्याचा.
समजू नका मला,
गर्व फार झाला.

ओळख काढण्याची सवय,
नाही मला मुळी.
आधी करा सुरूवात तुंम्ही,
मौत्री करा माझ्याशी.

तसा मी फार बोलतो,
बोलता बोलता वाहत जातो.
म्हणून मी स्वत:च,
माझ्यावर आवर घालतो.

बोला तूंम्ही आधी,
बोलेन मी त्याच क्षणी.
कंटाळाल तूंम्ही,
पण नाही कंटाळनार मी.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

🪶टक्कल आहे फॅशन आज!

  🪶 टक्कल आहे फॅशन आज! टक्कल माझं पडणारं पाहून, मला जरा टेन्शन येतं, पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून, माझंच मन धीर देतं. संपली आता पन्नाशी,...