Wednesday, May 23, 2018

सावर तुजला तुझ्याचसाठी


सावर तुजला तुझ्याचसाठी

नकोस सोडू धिर असा,
सावर तू स्वत:ला.

हसशिल तेथे हसतील सारे,
रडशील तेथे नाही कोणी.
अशीच रित ही या जगाची,
विसरू नको तू कार्य तूझे.

दोन दिवसासाठी कोणी,
जोडतील नाते तुझ्यासी.
विरह न सोसे त्या नात्यांचा,
तुटतील जेव्हा कायमची.

सोडूनी धिर हा का तू खचशी ?
तुझ्याचसाठी तुच असशी.
नाही कोणी या धरतीवरी,
तुझ्याचसाठी नाही कोणी.

मनात तू हा विचार करूनी,
सावर तुजला तूझ्याचसाठी.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...