Tuesday, July 29, 2025
मनी आस अजूनी आहे
Saturday, July 5, 2025
नित्य सतावीन तुला
"जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी"
"जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी"
तूच भवानी तू सरस्वती, शक्ती तू या जगताची.
तू कौशल्या दशरथाची, माता श्री प्रभुरामाची.
तूच देवकी तूच यशोदा, मैय्या नंदकिशोराची.
सत्यभामा तू तूच रुक्मिणी, भार्या तू श्रीकृष्णाची.
तूच गोपिका तूच प्रेमिका, राधा तू घनश्यामाची.
तूच घडविले शिवरायांना, आई जिजाऊ होऊनि.
ताराराणी लक्ष्मीबाई, तूच लढली रणांगणीही.
तू मुक्ताई तूच जनाई, तूच भार्या तुकोबांची.
वेणाबाई आक्काबाई, मीराबाई तू बहिणाबाई.
अनेक रूपे तुझीच माते, त्रिभुवनी तू वास करी.
शक्तीपीठेही तुझीच माते, शक्तीरूपे तू जळी स्थळी.
तूच भगिनी तूच भार्या, तूच माता तूच जननी
जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी.
*******************************
श्री. संभाजी रुक्मिणी कृष्णा घाडी
वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग
पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी?
पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी? कान्हाला राधा हल्ली, भेटलीच नाही, पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी? यमुनेचा तीर आता, सुना सुना भासे, र...
-
नित्य सतावीन तुला होतील यातना मला, सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला, स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...
-
मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...
-
🪶 टक्कल आहे फॅशन आज! टक्कल माझं पडणारं पाहून, मला जरा टेन्शन येतं, पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून, माझंच मन धीर देतं. संपली आता पन्नाशी,...
-
21. नव्या वर्षास ( 1995) 1. अमावाश्येच्या काळ्या रात्री , जन्म झाला तुझा. काळोखातूनी प्रकाश देसी , या नव्या चक्रला. दिव...
-
🪶 आई, जीवनाचा अर्थ आहे! घरी रोजच जातो आपण, तो तर नित्य प्रवास आहे. वाट पाहणार असेल कोणी, तर घरी जाण्यात अर्थ आहे. जेवण जेवतो रोजच आपण...
-
【ही कविता म्हणजे शाळेस देणगी देणाऱ्या देणगी दारांचे स्वागत करण्यासाठी तयार केलेले स्वागत गीत】 *_*दातृत्व तुमचे आम्हास भावे*_* या शाळेचे...
-
तू फक्त सोबत राहावं फुले माझी तुझ्यासाठी, तुझ्याच वेणीत सजवावी. फुलासारखी तू नेहमी, माझ्या अंतरंगी दरवळावी. ऋतू कोणताही असो, तुझी ...
-
" जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी " तूच भवानी तू सरस्वती, शक्ती तू या जगताची. तूच अंबिका तूच लक्ष्मी, पार्वती गौरीहर...
-
माझे गांव ते गाव असे मनोहर , तेथे फुले फुलती सुं दर , चोहोबाजूनी असे डोंगर , पुर्व दिशेला रांगणागड. सुर्य उगवतेा गडावर...
-
कविता माझी तुझीच होती कविता माझी तुझीच होती, तुझ्याकडे ती आज पोचली. किती वर्षाची ही आतुरता, माझी कविता तुझी जाहली. अनेक दिसाची इच्छा होती...

