भासते मज एकटयापरी
होतो जेव्हा तूंम्हा संगती,
नव्हती मजला खंत कशाची.
मनात नाही चिंता कशाची,
नाही कशाच ओझ.
बालपणाचे दिवस निराळे,
तुमच्या संगे जीवन जगावे.
मायेच्या त्या छायेखाली,
किती कराव्या गंमती जमती.
कुठे फिरावे किती खेळावे,
मौज करूनी घरी परतावे.
घरात येता मायेचे ते,
तुमच्या हातूनी खाऊ मिळावे.
आता पडलो फार दुर मी,
तुमचे शब्द नाही कानी.
नाही तुम्ही मज संगती,
भासते मज एकटयापरी.
येईल जेव्हा सुट्ठी आमुची,
धावत येईन तुमच्या पासी.
डोळे भरूनी पाहीन तुंम्हा,
खुप हसेन त्या समयी.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment