
एकटच राहायचं
सवय झाली आता मला,
एकट एकटच राहाण्याची.
कोण सोबत असेल तर वा!
नसेल सोबत तरीही वा!
काढायचेच आहेत ना दिवस,
मग सोबतीची अट कशाला?
वाटत असाव कोणीतरी,
पण सोबतच झाली पांगळी.
वाटत बोलाव कोणाशी तरी,
पण कोणीच दिसेनासे झालेत.
प्रत्येकाचे वेगळे बहाणे,
प्रत्येकाचे विचारच वेगळे.
ना कोणाशी पटत माझं,
एका विचाराने वागायचं कस?
असच हे पुढं चालायचं,
आपण फक्त एकटच राहायचं.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment