Wednesday, May 23, 2018

पहिलं अपयश


पहिलं अपयश

होतात मनाला यातना,
पहिल अपयश पचविताना,
वाढतात ठोके हृदयाचे,
त्याने कानच बंद होतात.

हसतात मुले आनंदाने,
खिन्न होतो मी अपयशाने,
जिवनातल्या या क्षणाला,
होरपळतात सारी स्वप्ने.

विचार करतो माता-पित्यांचा
चंदना सारखे जिवन झिजवितात,
पाहत असतात माझी स्वप्ने,
होईन मोठा म्हणत असतात.

मात्र मी इकडे एकटा,
विचार करतो अपयशाचा,
स्वप्न रंगवित असतो,
पचवावे कस हे आता.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...