
फुलपाखरू
तरळत तरळत मंदगतीने,
वातातून जाई l
सुंदर फुलावरी बसूनी,
मधही ते चाखी ll
लहान मुर्ती किर्ती मोठी,
उंच ही ते जाई l
अभ्येद्य गगन फोडूनी पुंन्हा,
पृथ्वीवर येई ll
सुंदर पंख पाहूनी
तूझे,
वेड फुला लागले l
नाजूक तूझ्या नयनांनी तू ,
फुलाला खूणावले ll
पुर्ण समजले तूझे हे चाळे,
वेड तूला लागतले l
पण पहात्या फुलाकडे,
ते फुल ही कोमेजले ll
***** संभाजी कृष्णा
घाडी
***** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment