Monday, May 21, 2018

राघू पोपट




राघु पोपट

राघु पोपट दिसतो हिरवा,
चोचीचातो रंग तांबडा;
मानेभोवती लाल पट्टा,
पायालामग रंग करडा.

शिकवितो मालक पोपटाला,
विठू विठू म्हण पोपटा,
चोर आला पकडा पकडा,
पाहूणेसाहेब बसा बसा.

दादासाहेब पेरू आणा,
आडवे उभे तुकडे करा,
आवडीचा तो  पेरू आणता,
लागतेा पोपट डूलायला.

घेवूनी तो पेरूचा तुकडा,
पोपट खातो करा करा,
अरे मानवा तुझा नियम आगळा,
का पकडशी तू पोपटाला?

बंद करूनी पिंजज्याच्या दारा,
का कोंडशी त्या मुक्या पक्षाला,
उघड तो मारेचा पिंजरा,
विहार करूदे त्या राघुला.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...