Monday, May 21, 2018

भाऊबीज


भाऊबीज

आला सण दिवाळीचा;
दिवे तेवती अंगणी.
मेणबत्ती पेटवूनी;
मुले नाचती अंगणी.
भाऊबीजेचा तो दिन;
येई याच मासामध्ये.
ओवाळील बहीण ती;
दिप घेवून तो हाती.
साता जन्माचे हे नाते;
असे भाऊ बहीणीचे.
नाही नशिबीते माझ्या;
दिले नाही ते देवाने.
तिन बंधूच ते आंम्ही;
नाही बहिण आंम्हाला.
वाट पाहू मी कोणाची;
ओवाळील कोण मला.
कोण सांगेल का कोणी;
ओवाळीन तुजला मी.
जोडूनीया शुद्ध नाते;
भिक्षा घालील का कोणी.
घाला भिक बहिणीची;
घाला भिक या मायेची.
ओवाळूनी मज तूंम्ही;
घाला बेडी कर्तव्याची.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे


No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...