
वाटत मनात
वाटत मनात कोणी तरी,
आपल्यावर प्रेम कराव.
भुंग्यासारख त्याच्या भोवती,
गाण गुणगुणत फिराव.
मंद सुगंधी वासाच,
मोहीनी एक फुल असाव.
फुलणाज्या त्या फुलाला,
खुलताना रोज पहाव.
वाटत मनात कोणी तरी,
आपल एक फुल असाव.
फुलताना त्या फुलाला,
दवबिंदूनी सजवाव.
पण हे अस कस होतं?
प्रत्येक फुल मान फिरवत.
नजर माझी होताच बाजूला,
मिश्किलपणे हसतं
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment