Wednesday, May 23, 2018

माझ्याच मनाला खातं

माझ्याच मनाला खातं

नाही तूझी माझी ओळख,
फक्त तूला पाहीले मी.
माझ्या मनातील भावना,
तुझ्यासाठी वाहील्या मी.
तुझ्या नयनांचे गुपित,
माझ्या नयनांनी हेरले.
माझ्या मनातील भावना,
मी तूला देवू केले.
तेज तूझ्या नयनांचे,
नाही आता अनोळखे.
पाहत जाईन जेवढे,
होत जाईल ते नवे.
जेव्हा तूझी भेट होते,
तुझी माझी नजर मिळते.
माझ्या मनाला वाटते,
तुझी नजर मला शोधते.
तुझ्या मनातील मी,
नाही कधी समजू शकलो.
म्हणून मी तूला कधी,
माझी नाही म्हणू शकलो.
माझ म्हणन सोप असतं,
कारण ते भावनीक असतं.
ठोकर मिळाल्यावर ते,
माझ्याच मनाला खातं.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

🪶टक्कल आहे फॅशन आज!

  🪶 टक्कल आहे फॅशन आज! टक्कल माझं पडणारं पाहून, मला जरा टेन्शन येतं, पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून, माझंच मन धीर देतं. संपली आता पन्नाशी,...