
क्षण
जिवनातला प्रत्येक क्षण;
असाच वाया घालवायचा का?
जिवनातल्या नविन क्षणाला;
रिकाम्या हातान पाठवायच का?
पुस्तक असत हातात फक्त;
मन मात्र दुसज्याच जगात.
बसलो आहे चार भिंतीच्या वर्गात;
मन मात्र स्वप्न वृंदावनात.
बुद्धी व मनाचा ३६ चा आकडा;
त्यात क्षणाचा होतो चुरगाळा.
अशान आता चालायच नाही;
मनाचा विचार करायचा नाही.
बुद्धीला एकट टाकायचं नाही;
या क्षणाला गप्प बसायच नाही.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
No comments:
Post a Comment