माझ्याच मनाला खातं
नाही तुझी माझी ओळख,
फक्त तुला पाहिले मी ।
माझ्या मनातील भावना,
तुझ्यासाठी वाहिल्या मी ।।
तुझ्या नयनांचे गुपित,
माझ्या नयनांनी हेरले ।
माझ्या मनातील भावना,
मी तुला देऊ केले ।।
तेज तुझ्या नयनांचे,
नाही आता अनोळखे ।
पाहत जाईन जेवढे,
होत जाईल ते नवे ।।
जेव्हा तुझी भेट होते,
तुझी माझी नजर मिळते ।
माझ्या मनाला वाटते,
तुझी नजर मला शोधते ।।
तुझ्या मनातील मी,
नाही कधी समजू शकलो ।
म्हणून मी तुला कधी,
माझी नाही म्हणू शकलो ।।
माझं म्हणणं सोपं असतं,
कारण ते भावनिक असतं ।
ठोकर मिळाल्यावर ते,
माझ्याच मनाला खातं ।।
✍️ संभाजी रुक्मिणी कृष्णा
घाडी
वेताळ बांबर्डे

No comments:
Post a Comment