Thursday, June 21, 2018
Wednesday, May 23, 2018
जखम या मनाची
जखम या मनाची
जगणे हे गं माझे झालेच व्यर्थ आहे,
म्हणतेस का तू आता, मी आहे तूझीच आहे.
पाहिले मी या माझ्याच डोळा,
माझे होऊनी कितीक दुर गेले;
अडविता मी माझ्याच हस्ते,
मीच त्यांना निरोप दिले.
जखम या मनाची,
नाही कधीच भरली;
खपली काढताना,
पुंन्हा जखम झाली.
मज ना कधीच कळली,
भाषा गं मिलनाची;
मन मिलन न होता,
मन ही विरून जाई.
कळल्या तुला न माझ्या भावना त्या मनीच्या,
जखमांतल्या त्या अजुनी वेदनांच्या;
जखमा भरून जाता घाव ही ते भरती,
जखम या मनाची नाही कधीच भरली.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
वेड्या मना तू
वेड्या मना तू,
नको कुणा माझं म्हणू.
माझ्या भावनांशी तू,
नको असं खेळू
दुनिया फार वेगळी आहे,
समोर तूला तूझी म्हणेल.
तू दुर झाल्यावर,
तिच तूला विसरेल.
बंध म्हणे रेशमी असतात,
काही केल्या नाही तूटत.
तोडणारे झटकण तोडतात,
तुटल्यावर ते रक्त काढतात.
विसरणारे सहज विसरतात,
भावनांचा कुठे विचार करतात?
भावना खुप नाजूक असतात,
दुखावल्यावर खंगत जातात.
भावना संपल्यावर,
सर्व काही संपत.
या जगातील माझं,
अस्थित्व तरी कुठे उरतं?
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
माझ्याच मनाला खातं
नाही तूझी माझी ओळख,
फक्त तूला पाहीले मी.
माझ्या मनातील भावना,
तुझ्यासाठी वाहील्या मी.
तुझ्या नयनांचे गुपित,
माझ्या नयनांनी हेरले.
माझ्या मनातील भावना,
मी तूला देवू केले.
तेज तूझ्या नयनांचे,
नाही आता अनोळखे.
पाहत जाईन जेवढे,
होत जाईल ते नवे.
जेव्हा तूझी भेट होते,
तुझी माझी नजर मिळते.
माझ्या मनाला वाटते,
तुझी नजर मला शोधते.
तुझ्या मनातील मी,
नाही कधी समजू शकलो.
म्हणून मी तूला कधी,
माझी नाही म्हणू शकलो.
माझ म्हणन सोप असतं,
कारण ते भावनीक असतं.
ठोकर मिळाल्यावर ते,
माझ्याच मनाला खातं.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
नजरेनं तरी का बदलाव?
तुझ्यासाठी जगत होतो,
तुला कधी कळले नाही.
तुझ्यात मला पाहत होतो,
तू कधी जाणले नाही.
कितीक रात्री नी दिवस,
तुझ्यासाठी घालवत होतो.
जीवनातला प्रत्येक क्षण,
तुझ्यासाठी वेचत होतो.
जवळ कधी आलो नाही,
तुझ्याशी कधी बोललो नाही.
दुरून तुला पाहिल्यावर,
माझा मीच उरलो नाही.
पटणार नाही हे तूला,
नजरेने नजरेसाठी जगणं.
स्वत:मध्ये स्वत:च मरून
माझं तूझ्यासाठी जगणं
वाटत मनात आता मला,
तुला वेगळया नजरेने पहाव.
पण तूच नाही बदललीस तर,
नजरेने तरी का बदलावं.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
निसर्ग माझा
निसर्ग माझा
निसर्ग माझा किती देखणा,
रंग फुलानी बहरूनी आला,
हिरवी झाडे लाल फुले ही,
लाविती वेड या मनाला.
कोण्या झाडावरी बौसोनी,
गाती पाखरे मंजुळ गाणी,
सुरराणी कोकीळा ही काळी,
कुहूकुहू गातसे ती गाणी.
दगडानाही पाझर फुटूनी,
पाण्याचा तो झरा वाहतो,
मला न ठावे कोठूनी येते,
मधुर जल हे दगडामधुनी.
उंच उंच ही झाडे झुडपे,
डोलती अपुल्या तालावरती,
संगत मिळते त्या झाडांना,
मंद वाहत्या त्या वाज्याची.
वेड लावितो असा निसर्ग हा,
मोहूनी टाके मम मनाला,
तव चरणी मी करीतो वंदन,
सुख शांती दे तव बाळांना.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
प्रेमगंध
प्रेमगंध
प्रितीच्या पाखरा,
नको भराज्या मारू;
जिवनातल्या आनंदाला,
गगनात नको सोडू.
उतर खाली भूतलावरी,
मौज करूया दोन जिवानी;
मौजेतल्या आनंदानी,
खुलवूया पृथ्वी सारी.
मनातल्या भावनांचा,
वाहूदे ग आज प्रवाह;
मिळवूनी हे दोंन्ही प्रवाह,
करू प्रितीचा इथे संगम.
संगमातल्या त्या मौजेची,
तुला न ठावे मौज आसुरी;
दोन जिवांच्या प्रेम कळीची,
फुलनारी ती प्रेम पाकळी.
फुलूदे ग या इथे फुलाला,
सुगंध वाहिल चौफेराला;
निसर्ग होईल धुंद आज गं,
तुझ्या नी माझ्या प्रेमगंधानं.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डेपहिलं अपयश
पहिलं अपयश
होतात मनाला यातना,
पहिल अपयश पचविताना,
वाढतात ठोके हृदयाचे,
त्याने कानच बंद होतात.
हसतात मुले आनंदाने,
खिन्न होतो मी अपयशाने,
जिवनातल्या या क्षणाला,
होरपळतात सारी स्वप्ने.
विचार करतो माता-पित्यांचा
चंदना सारखे जिवन झिजवितात,
पाहत असतात माझी स्वप्ने,
होईन मोठा म्हणत असतात.
मात्र मी इकडे एकटा,
विचार करतो अपयशाचा,
स्वप्न रंगवित असतो,
पचवावे कस हे आता.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
भासते मज एकटयापरी
भासते मज एकटयापरी
होतो जेव्हा तूंम्हा संगती,
नव्हती मजला खंत कशाची.
मनात नाही चिंता कशाची,
नाही कशाच ओझ.
बालपणाचे दिवस निराळे,
तुमच्या संगे जीवन जगावे.
मायेच्या त्या छायेखाली,
किती कराव्या गंमती जमती.
कुठे फिरावे किती खेळावे,
मौज करूनी घरी परतावे.
घरात येता मायेचे ते,
तुमच्या हातूनी खाऊ मिळावे.
आता पडलो फार दुर मी,
तुमचे शब्द नाही कानी.
नाही तुम्ही मज संगती,
भासते मज एकटयापरी.
येईल जेव्हा सुट्ठी आमुची,
धावत येईन तुमच्या पासी.
डोळे भरूनी पाहीन तुंम्हा,
खुप हसेन त्या समयी.
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
रूप सुंदरी
रूप सुंदरी
तुच माझी रूप सुंदरी
तुच माझी सुख दायीनी
तुझ्यावीना मी जगू कसा
तुझ्यासाठी मी वेडा जगी
तू मम सौंदर्याची खाण
तुच माझ्या प्रेमाची खुण
तुझ वाचूनी मी या जगी
कसा जगू एकटयापरी
तुझ्या मृदूल स्पर्शात मी
वेचीतसे मम जिवन
मज नकोस सोडू सखे
माझ्या प्रिय गुलाबराणी
****** संभाजी कृष्णा
घाडी
****** वेताळ बांबर्डे
तू फुलविला वसंत
तू फुलविला वसंत
तू फुलविला वसंत या मम ह्रृदयी,
हरविली मम मती तुझ पहाता क्षणी.
रंग तुझा लावितसे मज वेड,
रंगात तुझ्या लपली सौंदर्याची खूण.
रंग तूझा लाल गुलाबी पिवळसर,
अंगात तुझ्या रंग असे हिरवट.
किती तुझी रूपे पण नाव ते एकच,
गुलाबराणी तू लाविले मज वेड.
****** संभाजी कृष्णा घाडी
****** वेताळ बांबर्डे
अनामिका तू
अनामिका तू
रेखीले तूज स्वप्नात मी,
ना देखीले मम डोळ्यानी;
अनामिका येशील कधी तू,
माझ्या ह्रृदय मंदिरी.
सुरेल तूझे असतील डोळे,
लाजवतील निल नभा;
ओठ लाल असतील तुझे,
गुलाब ते फुलले कुठवरी.
गालावरी असेल तुझ्या,
भावतो लाजण्याचा;
मज टाकतील मोहून,
दोन नयनांच्या पापण्या.
केस तुझे
असतील,
लांब लांब
रंग काळा;
गो-या तुझ्या वर्णाला,
शोभेल लाल टिळा.
****** संभाजी
कृष्णा घाडी
****** वेताळ बांबर्डे
Subscribe to:
Posts (Atom)
"जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी"
"जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी" तूच भवानी तू सरस्वती, शक्ती तू या जगताची. तूच अंबिका तूच लक्ष्मी, पार्वती गौरीहरा...
-
काव्य मनमाला हाच एक छंद माझा चार शब्द लिहिण्याचा मनातल्या भाव नां ना तालबद्ध गुंफिण्याचा होईल ना यातूनीच मनमाला सुम...
-
राघु पोपट राघु पोपट दिसतो हिरवा , चोचीचातो रंग तांबडा ; मानेभोवती लाल पट्टा , पायालामग रंग करडा. शिकवितो मालक पोपटाला , ...
-
भाऊबीज आला सण दिवाळीचा ; दिवे तेवती अंगणी. मेणबत्ती पेटवूनी ; मुले नाचती अंगणी. भाऊबीजेचा तो दिन ; येई याच मासामध्ये. ...
-
तुझी सोबत मला तुझी सोबत मला , नेहमीच हवी हवीशी वाटते , तू जवळ नसलास की , मी बिथरुन जाते. याला मी काय म्हणू , नाव त्...
-
वेड्या मना तू वेड्या मना तू , नको कुणा माझं म्हणू. माझ्या भावनांशी तू , नको असं खेळू दुनिया फार वेगळी आहे , समोर तूला तू...
-
एक पाखरू. एक पाखरू धावते मज पाहूनी ; येई आडवे वाटेवरती. घाबरते मज मनातूनी ; पण ओळखीते मज स्वभावातूनी. रंग असे पाठीवरती निळा...
-
पांडूरंगा किती पाहू वाट तुझी पांडूरंगा l भारावले मन तुझसाठी ll विसरूनी मी हा दुजाभाव आता l शोध घेई तुझा पांडूरंगा...
-
गर्जा भारत माता भारत माते वंदन तुजला , करीतो हर समयाला ll धृ ll उंच उंच या पर्वत रांगा , दोन तटाला सागर लाट , सागर गर्जतो...
-
ढगांची किमया. धडाम धुडूम धडाम धुडूम , करती हे ढग ll उंच उंच आभाळी जावूनी , मिरवीती आपुला डौल ll वारा येई जोराचा , पळवी ढ...
-
सावर तुजला तुझ्याचसाठी नकोस सोडू धिर असा , सावर तू स्वत:ला. हसशिल तेथे हसतील सारे , रडशील तेथे नाही कोणी. अशीच रित ही या जग...