गणराया रे विघ्नहर्ता
ओम गं गणपतये नमो नमः, वंदन करितो प्रथम तुला l
तुझ्या कृपेची आस आम्हाला, गणराया रे विघ्नहर्ता ll
तूच गजानन तूच गणेशा, विनायका तू एकदंता l
गणाध्यक्ष तू भालचंद्र तू, बुद्धिनाथ तू वक्रतुंडा ll
मयुरेश्वर तू सिध्दीविनायक, चिंतामणी तू वरदविनायक l
गिरिजात्मज तू विघ्नेश्वर तू, महागणपती बल्लाळेश्वर ll
विघ्नराजेंद्र कृष्णपिंगाक्ष, गजवक्त्र तू धूम्रवर्ण तू l
गौरीसुता तू सिद्धिदाता, लंबोदर तू गजकर्णका ll
हेरंब विकट तू प्रथमेश्वरा, शूर्पकर्ण सुमुख तू मंगलमुर्ती l
अनेक नामे तुझीच देवा, आळवितो दर्शन दे मजला ll
कवी: श्री. संभाजी रुक्मिणी कृष्णा घाडी,

No comments:
Post a Comment