Thursday, October 22, 2026

प्रेमगंध

 

प्रेमगंध

 

प्रीतीच्या पाखरा,

नको भराऱ्या मारू ।

जीवनातल्या आनंदाला,

गगनात नको सोडू ।।

 

उतर खाली भूतलावरी,

मौज करूया दोन जिवांनी ।

मौजेतल्या आनंदाने,

खुलवूया पृथ्वी सारी ।।

 

मनातल्या भावनांचा,

वाहू दे ग आज प्रवाह ।

मिळवूनी हे दोन्ही प्रवाह,

करू प्रीतीचा इथे संगम ।।

 

संगमातल्या त्या मौजेची,

तुला न ठावे मौज आसुरी ।

दोन जिवांच्या प्रेम कळीची,

फुलणारी ती प्रेम पाकळी ।।

 

फुलू दे ग या इथे फुलाला,

सुगंध वाहेल चौफेराला ।

निसर्ग होईल धुंद आज गं,

तुझ्या नी माझ्या प्रेमगंधानं ।।

 

 ✍️  संभाजी रुक्मिणी कृष्णा घाडी

          वेताळ बांबर्डे



No comments:

Post a Comment

माझ्याच मनाला खातं

  माझ्याच मनाला खातं   नाही तुझी माझी ओळख, फक्त तुला पाहिले मी । माझ्या मनातील भावना, तुझ्यासाठी वाहिल्या मी ।।   तुझ्या नयनां...