Saturday, July 5, 2025

नित्य सतावीन तुल



नित्य सतावीन तुला

होतील यातना मला, 
सोडूनी जाईन जेव्हा तुला.
कशी विसरशील मला, 
स्वप्नी नित्य सतावीन तुला.

जरी सोडूनी गेलो तुज मी,
विसरू नाही शकत तुला मी.
कशी विसरशील सांग मला तू?
कशी टाकशील मनातून तू?

आठव तू ते क्षण दोघांचे,
जरी न पटले तुझे नी माझे.
किती भेटलो किती भांडलो,
तुझ्या वाचूनी नाही रमलो.

कसा विसरू सांग तुला मी?
मनातून तू कधी न गेली.
आठवणींची वादळ आली,
आसवांनी सृष्टी भिजली.

हृदय माझे तुजला दिधले,
चित्त माझे तुझं अर्पियले.
उरलो आहे आज भिकारी,
तुझ्या विना मी मृत प्रवासी.

तरी तुझी ही आज्ञा मानून,
आज तुला मी सोडून जाईन.
आठवणींच्या हिंदोळ्यावर, 
नित्य तुला मी भेटत राहीन.

कवी: संभाजी कृष्णा घाडी
      वेताळ बांबर्डे.

"जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी"

 "जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी"


तूच भवानी तू सरस्वती, शक्ती तू या जगताची.

तूच अंबिका तूच लक्ष्मी, पार्वती
गौरीहराची.


तू कौशल्या दशरथाची, माता श्री प्रभुरामाची.

तूच देवकी तूच यशोदा, मैय्या नंदकिशोराची.


सत्यभामा तू  तूच रुक्मिणी, भार्या तू श्रीकृष्णाची.

 तूच गोपिका तूच प्रेमिका, राधा तू घनश्यामाची.


तूच घडविले शिवरायांना, आई जिजाऊ होऊनि.

ताराराणी लक्ष्मीबाई, तूच लढली रणांगणीही. 


तू मुक्ताई तूच जनाई, तूच भार्या तुकोबांची.

वेणाबाई आक्काबाई, मीराबाई तू बहिणाबाई.


अनेक रूपे तुझीच माते, त्रिभुवनी तू वास करी.

शक्तीपीठेही तुझीच माते, शक्तीरूपे तू जळी स्थळी.


तूच भगिनी तूच भार्या, तूच माता तूच जननी

जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी.

*******************************

श्री. संभाजी रुक्मिणी कृष्णा घाडी

वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग


नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...