Saturday, December 28, 2024

कविता माझी तुझीच होती

कविता माझी तुझीच होती 

कविता माझी तुझीच होती, 
तुझ्याकडे ती आज पोचली.
किती वर्षाची ही आतुरता,
माझी कविता तुझी जाहली.

अनेक दिसाची इच्छा होती,
माझी कविता तू वाचावी.
माझ्या कविते मध्ये सखी तू,
तुझी प्रतिमा नित्य पहावी.

आज अचानक तुझी आठवण,
मनात माझ्या उमलून येते.
कंठ दाटतो आठवणीने, 
नयना मधुनी पाणी झरते.

भेट तुझी ना माझी घडली,
तरी मम मनी नित्य तू रमली.
तुझी आठवण मनातूनी गं,
आज मितीला नाही गेली.

तरी सुखी मी या जन्मी गं,
तुझ्या सुखाची आस धरुनी.
भेटू आपण पुढल्या जन्मी,
हीच मागणी देवा चरणी.


*****   संभाजी  कृष्णा  घाडी
*****  वेताळ बांबर्डे


मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...