Saturday, May 25, 2024

तुझी सोबत





तुझी सोबत मला



तुझी सोबत मलानेहमीच हवी हवीशी वाटते,
तू जवळ नसलास कीमी बिथरुन जाते.

याला मी काय म्हणू,
नाव त्याला काय देवू
,
तूझ्याबद्दलची ओढ म्हणू,
कि माझी कमजोरी म्हणू.

मित्र तुला म्हणते मी,
हूरहूर नात्यातली अनुभवते मी.

नाव काय देवू त्याला,
त्याचाच विचार करते मी.

प्रेम आपल नाही म्हणे,
गाठी बांधल्यात दुसरीकडे.

प्रेमळ आपले साथी रे,
एक विनंती करते रे.

कमजोरी माझी बनू नकोस,
दुर माझ्या जावू नकोस.

मला तू विसरु नकोस,
मी तुझाच आहेएवढ मात्र म्हणू नकोस.

*****   संभाजी  कृष्णा  घाडी
*****  वेताळ बांबर्डे

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...